स्वराज्याच्या निर्मितीसाठी 100 टक्के मतदान हवे

0

शिवचरित्रकार नितिन बानगुडे यांचे प्रतिपादन

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्याची निमिर्ती करण्यासाठी ज्या दिवशी शंभर टक्के मतदान होईल त्या दिवशी चूकीचा माणूस निवडणुन येणार नाही.त्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा मुलभूत हक्क बजावलाच पाहिजे. असे प्रतिपादन शिवचरित्रकार नितिन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले. ते अहमदनगर रोटरी क्लबच्या वतीने माऊली सभागृहात आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा उपवन संरक्षक ए.लक्ष्मी अहमदनगर रोटरी क्लबचे अध्यक्ष अभय राजे, सचिव सुजाता वाबळे व संचालक उपस्थितीत होते. किरण खोजे, बलभिम पठारे, शशि बिहाणी, अश्विनी भोर, नितीन वाबळे आदींसह रोटरी परिवारातील सदस्यांचा विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. रोटरीचे नुतन अध्यय अभय राजे यांनी मनोगत व्यक्त केले.
बानगुडे पाटील म्हणाले की, शिवाजी महारांच्या काळात जगण्यासाठी नाही तर, लढण्यासाठी स्पर्धा असायची. शिवाजी महारांजाचा इतिहास लढाई, किल्ले ऐवढाच नसून त्यापलीकडेही व्यवस्थापन हे महत्वाच होत.चंद्रगुप्तानंतर स्वतःचे आरमार उभे करणारे शिवाजी महाराज एकमेव आहेत.मात्र, आता किती वर्गाच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराज आहेत. हाच मोठा प्रश्‍न आहे. सीबीएसी अभ्यासक्रमाच्या सतराशे पानात केवळ चार ओळी शिवाजी महारांच्या आहेत. तर, संभाजी महाराजांचा इतिहास लांबच राहिला.अन दुसरीकडे 132 रा्रात शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास केला जातो.
शिवकालीन पाणी योजना, जमिन मोजणी, पाणी आडवा पाणी जिरवा आदी दुरदृी ठेवून केलेली कामे महाराजांनी त्याच वेळी केली आहे.मात्रा आता याची आडवा त्याची जिरवा हाच कार्यक्रम सुरु असल्याचे दिसून येते. महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीच वापरली. आपण पण किती उंचीवर गेलो हे महत्वाचे नाही. आपण किती जणांना तिथपर्यत घेऊन गेलो. ते महत्वाचे आहे, असे व्याख्याते नितिन बानगुडे यांनी सांगितले.

ध्येय गाठायचे असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्या लागतात.स्वराज्य नावाची राज्यात पहिली संस्था निर्माण करणार्‍या संस्थापिका राजमाता जिजाऊ आहेत.
रयतेच्या राज्यात माणसे मरायला अन लढायला मागे हटत नाही.कौतुकाची थाप टाकणार्‍या समाजात रत्न उगवतात. यावेळी क्षितीज झावरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दरम्यान रोटरी कलबच्या माध्यमातुन राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमाची माहिती दिली.जिल्हा शासकीय रुग्णालयात 20 रुग्णांना दर दिवशी जेवन, शिंगवे नाईक झेडपी शाळेला संगणक पुरवठा आदीसह इतर राबविण्यात आलेल्या कार्याची माहिती दिली.

 

LEAVE A REPLY

*