Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मतदानाचा व्हिडिओ; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचा आदेश

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – पाथर्डी तालुक्यातील मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान करतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी त्याची गांभीर्याने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहे. दरम्यान नगर शहर नेवासा या ठिकाणच्या मतदारसंघातही असेच मतदानाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. याबाबत मात्र प्रशासनाने सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

मतदान गोपनियतेचा भंग होऊ नये, यासाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करतांना मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कॅमेरे व मोबाईल बाळगण्यास व वापरण्यास मनाई आहे. मात्र, पाथर्डी तालुक्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, यात मतदान ईव्हीएमवर मतदान करतांनाचे व व्हीव्हीपॅट मधून स्लिप बाहेर आल्याचे दृष्य दिसत आहे. ईव्हीएम मशिनवर १६२ – डांगेवाडी असे स्टिकर लावण्यात आल्याचे दिसत आहे. या प्रकाराची जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी गंभीर दखल घेत चौकशीचा आदेश दिला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!