नगर क्लबसाठी गुरुवारी मतदान

0

यंदाही महिला निवडणुकीपासून दूर  

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर क्लब लिमिटेडसाठी गुरुवारी (ता. 30) मतदान होत आहे. त्याची प्रशासकीय पातळीवर तयारी झाली आहे. सचिव व संचालक पदासाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत महिलांना निवडणुकीपासून लांब ठेवण्यात आले आहे.
सचिव व संचालक, अशी मतपत्रिका असून, जेवढे उमेदवार निवडून द्यायचे आहेत, त्यांच्याच नावासमोर मतदानाची फुली द्यायची आहे. निवडून द्यावयाच्या संचालकांपेक्षा कमी किंवा जास्त फुली मारल्यास मतपत्रिका बाद होईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.
नगर क्लबची स्थापना सुमारे 1870 मध्ये झालेली आहे. उच्चभू्रचा क्लब म्हणून जिल्ह्यात त्याची ख्याती आहे. सचिव व संचालक मंडळाची दर दोन वर्षाला निवड होते. यावेळी सचिव पदासाठी दोन आणि अकरा संचालकांसाठी बारा जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सचिवपदासाठी पाच जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यात तिघांनी माघार घेतली. संचालक पदासाठी 22 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील दहा जणांनी माघार घेतली. क्लबचे स्थायी सभासद 1 हजार 447 आहेत. कार्पोरेट सभासद 36 आणि अजीवन सभासद 77 आहेत. या तीन विभागातील सभासदांनाच मतदानाचा अधिकार राहणार आहे.
या सभासदांपैकी कोणी वार्षिक शुल्क भरले नसले, तर त्याला मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. या क्लबचा पदसिद्ध अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत. स्व्हिहस मेंबर सहा असून, निमंत्रीत सभासद म्हणून पोलीस अधीक्षक, स्थानिक लष्काराच्या मुख्यालयातील प्रमुखांचा यात सहभाग आहे.
सभासदांमध्ये काही महिला मतदार आहेत. पण, या महिलांचा संचालक मंडळात सदस्य म्हणून कधीच सहभागी झाला नसल्याचा इतिहास आहे. यावर्षी देखील ती परंपरा कायम राहिली.

जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची तयारी सुरू आहे. उपजिल्हाधिकारी जयश्री माळी या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. चार मतदान केंद्र असून, प्रशासकीय पातळीवर सुमारे 49 कर्मचारी कार्यरत राहणार आहे. या कर्मचार्‍यांना मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण देण्यात आले.

हे आहेत उमेदवार
सचिवपदासाठी : अजय बोरा व नीलकंठ अमरापूर, संचालकपदासाठी : योगेश मालपाणी, राहुल काथेड, नीलेश चोपडा, विकी मुथा, हेमेंद्र कासवा, गौरव बोरा, आगेश धुप्पड, ईश्वर बोरा, पवन गांधी, संजय ताथेड, मयूर कोठारी, निखील कराचीवाला.

LEAVE A REPLY

*