Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

मतदानावर पावसाचे सावट; नगरसह राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Share

मुंबई – भारतीय हवामान विभागाने (आयएमडीने) दिलेल्या अंदाजानुसार विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी (सोमवारी) मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, नगर, कोकण आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात वादळी पाऊस होऊ शकतो. या पावसाचा परिणाम राज्यात अनेक ठिकाणी मतदानावर होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातले वातावरण बदलले आहे. परतीच्या मान्सूनमुळे पावसाला सुरुवात झाली असून सोमवार 21 रोजी मतदानाच्या दिवशीही पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविल्यामुळे याचा मतदानावर परिणाम होणार की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई उपनरांसह, ठाणे, पुणे, नगर, सातारा जिल्ह्यांमध्ये शनिवारी सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक आहे. असाच पाऊस सोमवारीही होण्याचा अंदाज आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!