Type to search

Featured मुख्य बातम्या राजकीय सार्वमत

राहुरीत सर्वाधिक मतदान

Share

नगर विधानसभा क्षेत्रात सर्वात कमी प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी 23 एप्रिल रोजी झालेल्या मतदानात 64.26 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आतापर्यंतच्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा हा उच्चांक ठरला. या मतदारसंघात एकूण 18 लाख 54 हजार 248 मतदारांपैकी 11 लाख 91 हजार 521 मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. यात 6 लाख 52 हजार 574 पुरुष तर 5 लाख 38 हजार 939 महिला मतदारांचा समावेश आहे. राहुरी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक 66.77 टक्के तर नगर विधानसभा मतदारसंघात 60.25 टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदान टक्केवारी वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वीप-2 अंतर्गत राबविलेले विविध उपक्रम, चुनावी पाठशालासारखा उपक्रम, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महसूल, पोलीस आणि इतर यंत्रणांमधील समन्वय राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केलेले नियोजन आणि विविध यंत्रणांची त्यांना मिळालेली साथ यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. त्याचबरोबर नवमतदारांचा उत्साह, ज्येष्ठ नागरिकांनी मतदानासाठी लावलेल्या रांगा, सखी मतदान केंद्राच्या संकल्पनेने मतदारांमधील उत्सुकता यामुळे मतदानाचा टक्काही वाढला. ग्रामीण भागातील मतदारांचा उत्साह हेही एक वैशिष्ट्य ठरले.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी पोलीस बंदोबस्ताचे केलेले नियोजन, काही मतदारसंघात वेबकास्टिंगद्वारे आणि सूक्ष्म निरीक्षकांद्वारे ठेवलेली करडी नजर यामुळे ही निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यास मदत झाली.

विविध विभागांच्या जबाबदारी पार पाडण्यासाठी नोडल अधिकारी नेमण्यात आले होते. त्यांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील विविध कामांच्या सुसूत्रीकरणासाठी झालेली मदत. मतदार, उमेदवार आणि राजकीय पक्षांना आवश्यक असलेली माहिती पुरवण्यासाठी तत्पर असलेली हेल्पलाईन, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी सज्ज असलेला कक्ष यामुळे निवडणूक कामकाजासंदर्भातील कमी झालेल्या तक्रारी हेही एकप्रकारे वैशिष्ट्य ठरले.

नगर विधानसभा मतदारसंघ
2 लाख 85 हजार 913 मतदारापैकी 1 लाख 72 हजार 276 मतदारांनी मतदान केले. यात 93 हजार 937 पुरुष व 78 हजार 333 महिला मतदार आहेत.
मतदानाची टक्केवारी 60.25
राहुरी विधानसभा मतदारसंघ
2 लाख 88 हजार 127 मतदारांपैकी 1 लाख 92 हजार 386 मतदारांनी मतदान केले. यात 1 लाख 5 हजार 728 पुरुष व 86 हजार 657 महिला मतदार आहेत.
मतदानाची टक्केवारी 66.77
शेवगाव विधानसभा मतदारसंघ
3 लाख 38 हजार 788 मतदारापैकी 2 लाख 14 हजार 785 मतदारांनी मतदान केले. यात 1 लाख 16 हजार 821 पुरूष व 97 हजार 963 महिला मतदार आहेत.
मतदानाची टक्केवारी 63.40.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ
3 लाख 09 हजार 324 मतदारापैकी 2 लाख 302 मतदारांनी मतदान केले. यात 1 लाख 11 हजार 910 पुरुष व 88 हजार 392 महिला मतदार आहेत.
मतदानाची टक्केवारी 64.75
पारनेर- विधानसभा मतदारसंघ
3 लाख 17 हजार 8 मतदारापैकी 2 लाख 9 हजार 799 मतदारांनी मतदान केले. यात 1 लाख 13 हजार 431 पुरुष व 96 हजार 368 महिला मतदार आहेत.
मतदानाची टक्केवारी 66.18
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ
3 लाख 15 हजार 88 मतदारापैकी 2 लाख 1 हजार 973 मतदारांनी मतदान केले. यात 1 लाख 10 हजार 747 पुरुष व 91 हजार 226 महिला मतदार आहेत..
मतदानाची टक्केवारी 64.10

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!