Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मतदान कंट्रोल मशीनची पूजा करणे पडले महागात

Share

प्रतिभा पाचपुते सह चार महिलांवर गुन्हा दाखल

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा मतदारसंघात काष्टी येथील मतदान केंद्र 280 मध्ये बळजबरीने घुसून विनापरवानगी मतदान कंट्रोल मशीनकडे जाऊन मशीनची पूजा करून त्याचा फोटो काढल्याने याबाबत केंद्राध्यक्ष सीताराम घोडके यांच्या फिर्यादीवरून भाजपचे उमेदवार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांच्यासह अन्य चार महिलां विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

समाज अजूनही श्रद्धा अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकला असताना देवभोळे पणात अनेक गोष्टी करत असतो; मात्र अनेक चुकीच्या रूढी परंपरा मध्ये समाज गुरफटला असून चुकीचे पायंडे पाडल्याने चुकीच्या गोष्टींच्या बाबत भारतीय दंड विधान संहितेने कायदे केलेले आहेत. अशाच प्रकारे निवडणुकीच्या बाबत देखील कायदे असून श्रीगोंदा मतदारसंघात काष्टी येथील मतदान केंद्र क्रमांक 280 मध्ये बळजबरीने घुसून विनापरवानगी मतदान कंट्रोल मशीन कडे जाऊन मशीनची पूजा करून त्याचा फोटो काढल्याने राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांच्यासह अन्य चार महिला अडचणीत सापडल्या असून याबाबत या मतदान केंद्राचे केंद्राध्यक्ष सीताराम घोडके यांच्या फिर्यादीवरून भाजपचे उमेदवार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुतेसह अन्य चार महिला विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सीताराम नाना घोडके (वय 53 वर्षे धंदा नोकरी राहणार मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर, हल्ली राहणार आष्टी तालुका आष्टी, जिल्हा बीड) येथील असून ते मतदानाच्या दिवशी काष्टी येथील मतदान केंद्रावर नियुक्तीस असताना प्रतिभा बबन पाचपुते व इतर अनोळखी चार महिला सर्व राहणार काष्टी तालुका श्रीगोंदा यांनी दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी सातच्या सुमारास मतदान सुरू होण्याच्या वेळेला मतदान केंद्रावर येऊन असा प्रकार केला. याबाबत दिनांक 22/10/2019 पहाटे 03 वाजून 2 मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतिभा पाचपुतेंसह अन्य चार महिलांच्या विरोधात .क्र व कलम श्र 1005/19 ळलि 143,147 लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार बीए नवले करत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!