Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मतदानाच्या चित्रीफिती व्हायरल; मोबाईल प्रतिबंधाकडे दुर्लक्ष

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील बारा मतदार संघात पावसामुळे सकाळच्या सत्रात संथगतीने सुरू झालेल्या मतदानाने सकाळी दहा वाजल्यानंतर वेग पकडला. परंतु मतदान केंद्रावर मतदारांसाठी घालण्यात आलेल्या मतदानाचे वारंवार उल्लंघनाच्या घटना झाल्या. मतदान करताना मतदार स्वतः बरोबर मोबाईल घेऊन जात होते. मतदान करताना काही उत्साही मतदार चित्रीकरण आणि छायाचित्र काढून ते समाज माध्यमांवर व्हायरल करत होते. या प्रकारावर मतदान केंद्र प्रमुखासह बंदोबस्ताला असलेले पोलीस देखील दुर्लक्ष करत होते. मतदानाच्या गोपनीयतेबाबत प्रशासनच गहाळ ठरल्याची चर्चा जिल्हाभर होत होती.

नगर जिल्ह्यात ९६ हजार ६६१ मतदान केंद्र आहेत. यातील बहुतांशी मतदान केंद्रावर मतदार हे मोबाईल घेऊन जाऊन मतदान करत होते. मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास मनाई असताना देखील, त्याची अंमलबजावणी करण्यात मतदान केंद्र अधिकारी दुर्लक्ष करत होते. काही उत्साही मतदारांनी आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केले, याचे चित्रीकरण छुप्यापद्धतीने मोबाईलमध्ये करत होते. यात बहुतांशी काही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आघाडीवर होते. हे चित्रीकरण समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात येत होते.

यात नेवासे, नगर, कर्जत-जामखेड, अकोले, पारनेर, शिर्डी मतदारसंघाचा समावेश होतो. त्यामुळे मतदारांमध्ये मतदानाच्या गोपनीयतेविषयी संभ्रमाचे वातावरण होते. नगर शहरात असेच चित्रीकरण व्हायरल झाले. नेवासे मतदार संघातील देखील चित्रीकरण व्हायरल झाले होते. त्यामुळे मतदान केंद्रावरील अधिकारी आणि पोलीस बंदोबस्त काय करतात, याबाबत प्रशासकीय अधिकार्‍यांमध्येच चर्चा होती. अशा चित्रीफिती व्हायरल होत असल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मतदानाविषयी गोपनीयता राखण्यातच प्रशासनाचा अपयश आल्याची चर्चा होती. याबाबत कोणी जाब विचारणार का, असा प्रश्न सामाजिक संघटनांकडून होत होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!