Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मतमोजणीवेळी जिल्ह्यात दोन हजार पोलिसांची फौज

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काही ठिकाणी अपवाद वगळता विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत तालुक्याच्या ठिकाणी गुरुवारी (दि. 24) मतमोजणी होणार असून मतमोजणी वेळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार पेक्षा जास्त पोलिसांची फौज सज्ज झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्यातील बारा मतदारसंघात शांततेत मतदान पार पाडण्यासाठी 7 हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. पावसातही पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला. केंद्रीय सशस्त्र दल, राज्य राखीव दल, गुजरात, मध्यप्रदेश होमगार्ड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी मतदान शांततेत पार पाडण्यासाठी कंबर कसली.

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी इव्हीएम स्ट्राँगरूम मध्ये ठेवण्यात आले आहे. यासाठी पोलीसांचा दिवसरात्र खडा पहारा आहे. गुरुवारी (दि. 24) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीसाठी सुरवात होणार आहे. विजयी उमेदवाराला मतमोजणी ठिकाणी मिरवणुकीला मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी वेळी काही उत्साही कार्येकर्त्यांकडून गालबोट लागण्याची शक्यता असते. यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक ईशू सिंधू यांनी पोलिसांऩा कायदा सुव्यवस्था बिघडून न देण्यासाठी चौकस पहारा ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बंदोबस्तामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी, होमगार्ड अशा दोन हजार पेक्षा जास्त पोलिसांची फौज सज्ज झाली आहे. मतमोजणी नंतर गोंधळ घालणर्‍यांवर विशेष लक्ष असणार आहे.

असा असेल बंदोबस्त
पोलीस अधीक्षक – 01
अतिरिक्त पोलीस अधीक्षक- 02
पोलीस उपअधीक्षक- 09
निरीक्षक – 73
पोलीस कर्मचारी – 1380
नगरचे होमगार्ड – 650

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!