17 हजार सैनिकांची नावे मतदार यादीतून वगळली

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा निवडणूक शाखेने सध्याची संपूर्ण सैनिक मतदार यादी रद्द करून जिल्ह्यातील तब्बल 17 हजार 365 सैनिकांची नावे यादीतून वगळली आहेत.  भविष्यात नव्याने यादी तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.
जिल्ह्यात सैनिकांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 17 हजार 365 सैनिक मतदारांची ही यादी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येत होती. परंतु यातील अनेक सैनिक सध्या बदलून गेले आहेत, तर काही सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीत सैनिक मतदारांना पाठविण्यात येणार्‍या 90 टक्के मतपत्रिका परत येत होत्या.
म्हणून जिल्हा निवडणूक शाखेने ही सैनिक मतदार यादी रद्द करण्याचा प्रस्ताव भारत निवडणूक आयोगास सादर केला होता. त्यास मान्यता देत निवडणूक आयोगाने पुन्हा नवी यादी तयार करण्याचे सांगितले आहे. त्यानुसार आधीची जुनी यादी रद्द करून आता नवीन मतदार यादी तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी संरक्षण विभागावर सोपविण्यात आली आहे.
तालुकानिहाय रद्द केलेली नावे –
अकोले-690, संगमनेर -1028
शिर्डी – 692, कोपरगाव- 606
श्रीरामपूर – 792, नेवासा-739
शेवगाव – 1379, राहुरी -1529
पारनेर- 3258, नगर- 1448
श्रीगोंदा – 3905 आदी
एकूण – 17 हजार 365 नावे रद्द केले.

LEAVE A REPLY

*