Friday, April 26, 2024
Homeनाशिकमतदार पडताळणी मोहिमेला 20 फेबु्रवारीपर्यंत मुदतवाढ; ‘बीएलओें’ना दिलासा: 89 हजार मतदारांची पडताळणी

मतदार पडताळणी मोहिमेला 20 फेबु्रवारीपर्यंत मुदतवाढ; ‘बीएलओें’ना दिलासा: 89 हजार मतदारांची पडताळणी

नाशिक । प्रतिनिधी

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार पडताळणीचे काम सुरू आहे. 20 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील 15 मतदारसंघातील 45 मतदारांची पडताळणी करण्याचे उदिष्ट्य देण्यात आले होते. पण या कामातील अडचणी लक्षात घेता मतदार पडताळणीला 20 फेबु्रवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 28 फेब्रुवारीला प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बीएलओंना मतदारांच्या घरी जाऊन पडताळणी करायची आहे. बोगस मतदान होऊ नये आणि बिनचूक अद्ययावत मतदारयादी तयारी व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदाराचा आधार नंबर आणि फोन नंबर मतदारयादीत नोंदविला जात आहे. यातून स्थलांतरीत, दुबार, मृत आणि बोगस मतदारांची नावे आपोआप रद्द होतील.

या पडताळणीत संबंधित कुटुंबातील सर्वच 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींची नावे एकाच ठिकाणी नोंदविली जाणार आहेत. शिवाय त्यातील जानेवारी 2020 साली 18 वर्षे पूर्ण होणार्‍या व्यक्तींची नावेही नोंदविली जाणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षी किती नवीन मतदारांची नोंदणी होणार, हे आयोगाच्या लेखी राहील.

त्यासाठी निवडणूक आयोगाने 20 डिसेंबर ही अंतिम मुदत जाहीर केली होती. परंतु या मुदतीत जिल्ह्यात अवघे 89 हजार मतदारांची पडताळणी झाली. त्यामुळे अजूनही जवळपास सर्वच 44 लाख मतदारांची पडताळणी बाकी होती. 15 दिवसांत जिल्ह्यातील सुमारे 45 लाख मतदारांपर्यंत पोहोचणे हे यंत्रणेसाठी आव्हान ठरले. शुक्रवार 20 डिसेंबर ही अंतिम मुदत संपूनही बहुतांश मतदार पडताळणी विनाच राहिले. त्यामुळे या मोहिमेला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी राज्यातील निवडणूक शाखांकडून केली गेली. त्यानुसार मतदार पडताळणीला 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या