दिंडोरी मतदारसंघात मतदान चिट्ठयांचे वाटप; मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता

0

विखरणी | वार्ताहर

दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे मतदान आठ दिवसांवर येऊन ठेपले आहे. मतदार संघातील मतदारांना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्यांमार्फत गावोगावी चिट्ठी वाटप करण्यात येत आहे.

विखरणी येथे केंद्रस्तरीय मतदान अधिकारी नामदेव पगार हे घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी जाऊन मतदान चिट्ठी व माहिती पुस्तकाचे वाटप करत आहेत.

सार्वजनिक निवडणुकीत मतदारांना मतदार यादीत नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असे यात वेळ व श्रमही वाया जायचे.

मात्र आता मतदानाच्या आधीच चिट्ठी मिळत असून त्यावर मतदाराचे नाव फोटो मतदान केंद्र स्थळ मतदार कार्ड नंबर अशी सर्वकष माहिती मतदारांना दिली जात आहे.

यामुळे अशिक्षित मतदारांना नाव शोधण्याचा त्रास कमी झाला असून यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

यावर्षी निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदाराला देण्यात येत असून यात मतदाराने काय करावे व काय करू नये याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

*