मतदार नोंदणीस टाळाटाळ करणार्‍या प्राचार्य, महाविद्यालयावर कारवाई!

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – 18 वर्ष पूर्ण असणार्‍या आणि महाविद्यालयात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेवेळी अर्जासोबत मतदार नोंदणीस करण्यास टाळाटाळ करणार्‍या महाविद्यालयासह प्राचार्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.
निवडणुक आयोग 1 ते 31 जुलै या कालावधीत 18 ते 21 वयोगटातील युवकांची मतदार यादीत नावनोंदणीसाठी विशेष मोहिम राबणार आहे. वय पूर्ण असतांना मतदार यादी नसणार्‍या विद्यार्थ्यांच्या नावाची यादी तयार करण्याचे सूचीत केले आहे. संबधीत सर्वाचा नमुना नंबर 6 भरुन घेण्यात येणार आहे. त्या सोबत जन्म तारखेचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, तहसिलदार यांच्याकडील अधिवास प्रमाणपत्र, सर्वसाधारण रहिवासाचा पुरावा (बँक पासबुक,पोस्टाचा पत्याचा पत्ता, वीज/दुरध्वनी बील) आदी कागदपत्रे आवश्यक आहे.
ज्या विद्यार्थ्याचे सर्वसाधारण रहिवास 128 शिर्डी विधानसभा मतदार संघात असल्यास त्यांचा केवळ नमुना नंबर 6 भरुन घेण्यात यावा. इतर विद्यार्थ्याना त्यांचा रहिवास ज्या मतदार संघात असेल त्या त्या मतदार संघाचे अधिकारी यांच्याकडे संबधित फॉर्म सादर करण्याच्या सूचना महाविद्यालय स्तरावर देण्याच्या सुचना देण्यात येत आहेत.

9 ते 23 जुलै दरम्यान बीएलओंची जबाबदारी –
1 ते 31 जुलै या कालावधीत राबविण्यात येणार्‍या मतदार नोंदणीमध्ये 9 ते 23 दरम्यान विशेष मतदार नोंदणी आयोजीत करण्यात आली असून मतदान केंद्रिय स्तरीय अधिकार्‍यांना यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर हजर राहून पात्र नागरिकांकडून नमुना नंबर 6 भरुन घेण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

*