अशी आहे राष्ट्रपती निवडणूक प्रक्रिया; आज मतदान, २० ला निकाल

0

नवी दिल्ली, ता. १७ : देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होत असून २० जुलैला मतमोजणी आणि निकाल लागणार आहे. त्यानंतर नवे राष्ट्रपती कोण हे समजेल.

विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २४ जुलैला संपणार आहे.

सत्ताधारी भाजपा आघाडीने बिहारचे माजी राज्यपाल रामनाथ कोविंद यांना उमेदवार निवडले असून विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह अन्य पक्षांनी मीराकुमार यांना उमेदवार निवडले आहे.

आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

‘मला तुमच्या सोबत काम करायला आवडेल’, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना म्हणाले.

आज संसद भवन आणि सर्व्‍ राज्यातील विधानभवनांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे.

त्यानंतर सर्व मतदान पेट्या दिल्ली येथे आणल्या जातील व दिल्लीत मतमोजणी होईल.

राष्ट्रपती निवडणूकीत आज एकूण ४८९६ मतदार मतदान करणार आहे. त्यापैकी ७७६ खासदार आहेत, तर ४१२० आमदार आहेत. त्यातून एकूण मतांची संख्या दहा लाख 98 हज़ार 903 इतकी आहे.

मध्यप्रदेश चे भाजपा आमदार नरोत्तम मिश्र यांना अयोग्य ठरविल्याने आता एकूण मतदारांची संख्या चार हजार ८९५ इतकी आहे.

फोटो सौजन्य : डीडीन्यूज

दरम्यान सत्ताधारी भाजप पुरस्कृत उमेदवार रामनाथ कोविद यांचे पारडे जड समजले जात असून त्यांना ६३ टक्के किंवा जास्त मते मिळतील असा अंदाज व्यक्त होत आहे.

 

LEAVE A REPLY

*