Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी पार पडेल मतमोजणी

Share
file photo

File Photo 

नाशिक | प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात होत्या. यानंतर राज्यात  काल सर्वत्र मतदान पार पडले. किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान पार पडले पण मतदानाचा टक्का मात्र यावर्षी घटला. सर्वांचे लक्ष आता मतमोजणीकडे लागून आहे. नाशिक जिल्ह्यात मतदान पार पडल्यानंतर सायंकाळी स्ट्राँगरुम तसेच  मतमोजणी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

जिल्हयातील 15 विधानसभा मतदार संघाची मतमोजणीचे ठिकाण संबंधित विधानसभा मतदारसंघामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार निश्चित करण्यात आलेली आहे.

मतमोजणी केंद्रावर सुरक्षा व्यवस्था, पार्कींग व्यवस्था, गर्दी व्यवस्थापन, सी.सी.टी.व्ही.सह सर्व व्यवस्था उपलब्ध करण्यात आली असून २४ तास याठिकाणी केंद्रीय पोलीस दलाचा पहारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ क्रमांक.व नाव मतमोजणी केंद्राची माहिती

113- नांदगाव इतर शासकीय नविन इमारत कार्यालय, नांदगाव तहसिल कार्यालय

114- मालेगांव मध्य शिवाजी जिमखाना, श्रीरामनगर, संगमेश्वर, मालेगांव

115- मालेगांव बाहय महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोडावून, कॅम्परोड, मालेगांव

116- बागलाण नविन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, बागलाण आवार, सटाणा

117- कळवण पंचायत समिती सभागृह, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कळवण

118- चांदवड नविन प्रशासकीय इमारत, मनमाड रोड, चांदवड

119- येवला औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाभूळगांव बु.

120- सिन्नर तहसिल कार्यालय, सिन्नर

121- निफाड कर्मवीर गणपतराव मोरे संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, निफाड

122- दिंडोरी म.वि.प्र. संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, उमराळे रोड, दिंडोरी

123- नाशिक पूर्व विभागीय क्रिडा संकुल, नवीन आडगांव नाका, नाशिक

124- नाशिक मध्य मनपाचे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, नाशिक

125- नाशिक पश्चिम छत्रपती संभाजी स्टेडियम, अश्विन नगर, सिडको, नाशिक

126- देवळाली विभागीय कार्यालय, ना.रोड, महानगरपालिका, नाशिक

127- इगतपुरी शिवाजी स्टेडीयम, कन्या शाळेजवळ, सीबीएस, नाशिक.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!