#Vogue : ‘वोग’ मासिकाच्या कव्हर पेजवर झळकली मिताली

0

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज ‘वोग इंडिया’ मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली आहे.

या फोटोमध्ये ती अभिनेता शाहरुख खान आणि व्यवसाय क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडणाऱ्या नीता अंबानी यांच्यासोबत झळकली आहे.

‘वोग इंडिया’ला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मासिकातर्फे तीन मुखपृष्ठ तयार करण्यात आले आहे.

तिने पोस्ट केलेल्या या फोटोला अनेकांनीच रिपोस्ट केलं असून त्याला बरेच लाइक्सही मिळाले आहेत.

‘वोग इंडिया’च्या मुखपृष्ठावर झळकणं ही काही छोटी बाब नाही. त्यातही मितालीचा नवा अंदाज यात पाहायला मिळत असल्यामुळे चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे.

‘वुमेन ऑफ द इयर… अॅण्ड द मेन वी ऑल लव्ह’ अशा टॅगलाइअंतर्गत ‘वोग’चे हे मुखपृष्ठ डिझाईन करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

*