#VivoProKabaddi : दबंग दिल्लीची जयपूर पिंक पँथर्सवर ३०-२६ ने मात; पटणा पायरेट्सची धडाक्यात सुरुवात

0

MATCH 3 : पहिल्या सत्रात १० गुणांनी पिछाडीवर असलेल्या दबंग दिल्लीच्या संघाने प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाच्या पहिल्याच सामन्यात जयपूर पिंक पँथर्सवर मात केली आहे.

इराणीयन खेळाडू मिराज शेखच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दबंग दिल्लीने अटीतटीच्या लढाईत मनजीत छिल्लरच्या जयपूर पिंक पँथर्सवर ३०-२६ अशी मात केली आहे.

MATCH 4 : गेल्या दोन पर्वाची विजेती टीम असलेल्या पटणा पायरेट्सने आपल्या पाचव्या पर्वाची सुरुवातही मोठ्या धडाक्यात केली आहे.

तेलगू टायटन्सला आपल्या घरच्या मैदानावर दुसऱ्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

कर्णधार राहुल चौधरी फॉर्मात असला की तेलगू टायटन्सचा संघ चांगली कामगिरी करतो, मात्र यदाकदाचीत त्याचा फॉर्म बिघडला की संपूर्ण संघाच्या कामगिरीवर त्याचा परिणाम होतो हे अनेकदा दिसून आलं आहे. आजच्या सामन्याच्या पहिल्या सत्रात राहुल चौधरीने काही सुरेख पॉईंट मिळवत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार प्रदीप नरवालला संघाबाहेर बसवण्यात तेलगूचे खेळाडू यशस्वी झाले. मात्र पटणा पायरेट्सने तितक्याच जोरात कमबॅक करत सामन्यात एका गुणाची आघाडी घेतली.

LEAVE A REPLY

*