ग्राहकांसाठी खुशखबर : Vivo Y ८३ Pro ; प्री बुकिंग सुरु 

0

मुंबई : विवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी नुकताच Vivo Y ८३ Pro हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून प्री बुकिंग सुरु आहे. Vivo कंपनीने मे २०१८ मध्ये Vivo Y ८३ हा स्मार्टफोन सादर केलेला आहे. याचीच पुढील व्हर्जन Vivo Y ८३ Pro या मॉडेलच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विवो कंपनी आपला विवो व्ही ११ हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. मात्र याआधी विवो वाय ८३ प्रो हे मॉडेल ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे.

Vivo Y ८३ Pro या मॉडेलमध्ये ६.२२ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १५२० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाईलची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यामध्ये १३ व २ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे तसेच फ्रंट कॅमेरा हा ८ मेगापिक्सल्सचा आहे.

हा स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड ओरियो ८.१ देण्यात आला असून फनटच ४.० या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा आहे. फोनमध्ये ३,२६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत १५,९९० रूपये असून विवोच्या देशभरातील शॉपीजमधून याची प्री बुकिंग सुरू करण्यात आली आहे. लवकरच याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात येईल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

*