Type to search

विवेक ओबेरॉय नागपुरात आला अन् आल्या पावलीच माघारी फिरला!

हिट-चाट

विवेक ओबेरॉय नागपुरात आला अन् आल्या पावलीच माघारी फिरला!

Share
मुंबई- अभिनेता विवेक ओबेरॉय गेल्या अनेक दिवसांपासून ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी होता. काल याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विवेक नागपुरात येणार होता. दुपारी तीन वाजता नागपुरात त्याची पत्रपरिषद होणार होती. तसा तो आलाही. पण नागपूर विमानतळावरून त्याला आल्या पावलीच माघारी परतावे लागले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली. विवेक नागपूर विमानतळावर उतरला आणि नेमक्या त्याच क्षणी ‘पीएम नरेंद्र मोदी’च्या प्रदर्शनाला स्थगिती मिळाल्याची वार्ता त्याला कळली. मग काय, विवेकने विमानतळाबाहेरही पडण्याची तसदी घेतली नाही. तो विमानतळावर उतरला आणि थोड्याच वेळात आल्या पावली मुंबईला रवाना झाला.

‘पीएम नरेंद्र मोदी’ हे बायोपिक दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी दिग्दर्शित केले आहे. विवेक ओबेरॉय यात नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. दोन दिवसांपूर्वी ‘पीएम नरेंद्र मोदी’चे प्रदर्शन थांबवण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती आणि यासंदर्भातील निर्णय निवडणूक आयोगावर सोपवला होता. ‘पीएम नरेंद्र मोदी’ 11 एप्रिलला प्रदर्शित झाल्यास आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल काय? याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल, असे सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना स्पष्ट केले होते. त्यानुसार, काल प्रदर्शनाच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली. त्यामुळे हा चित्रपट आज 11 एप्रिलला प्रदर्शित होऊ शकला नाही. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!