इथे हरवली माणुसकी!

0
जयेश शिरसाळे 
आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात एकोपा राहावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी जिल्हाभरात पोलिस व जिल्हा प्रशासनातर्फे शांतता कमिटीच्या बेैठका घेण्यात येत आहे. परंतू शहरात गेल्या तीन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी होवून दगडफेक झाल्याची घटना घडली होती.

या घटनेमुळे शांतता कमिटीच्या बैठका केवळ नावापुरत्याच घेतल्या जात असल्याचे उघड झाले आहे. जातीय तेढ निर्माण करणार्‍या या दगडफेकीच्या घटनेमुळे दोन गट एकमेकांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे समाजात एकोपा कमी होवून माणुसकी कुठेतरी हरवल्याचे दिसून येत आहे.

सण, उत्सावाच्यावेळी पोलिस व जिल्हा प्रशासनातर्फ शांतता कमिटीच्या बैठका घेण्यात येतात व शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येते. परंतू शहरातील तांबापुरा भागात संमिश्र वस्ती आहे. याठिकाणी नेहमीच लहान-मोठे वाद होत असतात, या वादातून अनेकदा दंगलीसह दगडफेकीच्या घटना घडल्या आहे. त्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी औपचारिकता म्हणून नेहमीप्रमाणे पोलिस प्रशासनांकडून शांतता कमिटीच्या बैठका घेण्यात येतात व त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येते.

बैठकीत सर्व समाजाचे लोक एकत्र येतात व सामंजस्य दाखवितात. परंतू या नेहमीच्या वादावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी कुठलीही उपायोजना मात्र करण्यात येत नसल्याचे दिसून येते. पूर्वीसारखा समाजातील एकोपा कायम राहण्यासाठी माणुसकी कायमस्वरुपी जपली गेली पाहिजे.

वादानंतर दोन्ही गट एकमेकांच्या जीवावर उठतात. त्यामुळे माणुसकी कुठेतरी हरवल्यासारखे वाटते. माणुसकी कायम ठेवण्यासाठी समाजातील काही प्रतिष्ठितांनी पुढे येण्याची गरज आहे. पोलिस प्रशासनांकडून घेण्यात येत असलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत तेच-तेच चेहरे असतात, नवीन चेहर्‍यांना संधी दिली गेली पाहिजे. तांबापुर, फुकटपुरा भागात आगीत अनेक घरे जळून खाक झाली.

आग विझविण्यासाठी तसेच समान बाहेर काढण्यासाठी माणुसकीच्या नात्याने अनेकजण पुढे आले. मात्र या मदतकार्यादरम्यान बाहेर काढलेला संसारोपयोगी सामान, सिलेंडर चोरुन नेल्याच्या घटना घडल्या अन् इथे माणुसकीच हरविल्याचे दिसुन आले.

LEAVE A REPLY

*