Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

video : मानाच्या विशाल गणपती मिरवणूकीस प्रारंभ

Share

अहमदनगर(प्रतिनिधी)- मानाच्या विशाल गणपतीची उत्थापन पूजा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता झाली. यावेळी नगरच्या ग्रामदैवत विशाल मंदीरात विश्वास्तांसह गणेशभक्तांची मोठी गर्दी होती. त्यानंतर विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे.

-विसर्जन मिरवणूकीसाठी रथ देखील आकर्षक पध्दतीने सजविण्यात आला. मानाच्या विशाल गणपतीची विसर्जन मिरवणूक रामचंद्र खुंट येथून प्रारंभ झाला.

-श्री विशाल गणेशाचा रथ ओढून मिरवणुकीस जिल्हाधिकारी राहुल दिवेदी, देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर व विश्वस्तांनी प्रारंभ केला.

-लाडक्या गणपती बाप्पाला भक्तीपूर्ण भावाने निरोप देण्यासाठी अवघे नगर सज्ज झाले आहे.

-मानाच्या विशाल गणपती विसर्जन मार्गावर रंगसंस्कृती ग्रुपने यावेळी देखील पायघड्या रांगोळी काढण्याचे नियोजन केले आहे.गेल्या सात वर्षांपासून रंगसंस्कृती ग्रुप हा उपक्रम करत असल्याचे ग्रुपचे कलाकार दिनेश मंजरतकर आणि विशाल आहेर यांनी सांगितले.

-विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या सवता माळी भजनी महिला मंडळने सादर केलेले दांडिया सादर केला.

– मानाच्या विशाल गणपतीची रामचंद्र खुंट येथे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली.

-नगर शहराचे आराध्य दैवत विशाल गणपतीची मिरवणूक चितळे रोड येथे आली असता महिला मंडळींनी धरला ठेका

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!