भक्ताकडून श्री विशाल गणपतीला १ किलो चांदी अर्पण

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सध्या प्रगतीपथावर सुरु असून, आता ते अंतिम टप्प्यात आलेले आहे.
मंदिराच्या गणेशमूर्ती समोरील प्रवेशद्वार अतिशय कलाकुसरीने बनविण्यात येत असून, त्यावर अत्यंत कोरीव व सुबक पद्धतीने चांदीचे कोरीव काम करण्यात येणार आहे.
यासाठी मोठ्या प्रमाणावर चांदीची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेता मंदिराचे सहसचिव रामकृष्ण राऊत यांनी मंदिराच्या कामाकरीता १ किलो चांदी अर्पण केली आहे. या कामासाठी आणखी चांदीची आवश्यकता असून, भाविकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन श्री विशाल गणेश मंदिरचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे यांनी केले.
संकष्ट चतुर्थीनिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे सहसचिव रामकृष्ण राऊत यांनी १ किलो चांदी अर्पण केली.
याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्‍वस्त पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ ङ्गुलसौंदर, कमलबाई राऊत, सुभाष राऊत, नंदकिशोर राऊत, सुनिल राऊत, नितीन राऊत, शिवाजी शिंदे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*