Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अकोले : वीरगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील गणपतीचे विसर्जन

Share

वीरगाव (वार्ताहर)- अकोले तालुक्यातील वीरगावच्या स्वामी विवेकानंद विद्यालयातील गणेशाचे विसर्जन मोठ्या जल्लोषात करण्यात आले.अनंत चतुर्दशीचा हा सोहळा विद्यार्थांच्या विविध नृत्यांनी आकर्षक ठरला.
गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये श्रीगणेशाच्या आरतीसाठी गावातील ग्रामस्थ व पालकांना आमंत्रित करण्यात आले होते. यांच्या सत्कार शाल व श्रीफळ न देता पुस्तक व आंब्याचे रोप देऊन करण्यात आला. यामधून मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी पर्यावरण जागृती व वाचन संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाचे सर्वच ग्रामस्थांनी व पालकांनी कौतुक केले.

अनंत चतुर्दशीला श्रींची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात पार पडली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मंगळागौर, लेझीम, गणपती नृत्य, झांज नृत्य सादर केले. या कार्यक्रमांनी ग्रामस्थांची मने जिंकली. कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी वीरगाव ग्रामस्थ, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. विद्यालयाचे मुखाध्यापक सुदर्शन ढगे यांनी 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थांना विविध नृत्यासाठी मार्गदर्शन केले होते. वीरगाव ग्रामस्थांनी विद्यार्थांच्या कलाविष्कारावर खुश होऊन स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!