Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कान्हेरी नदीला आलेल्या पुरामुळे वीरगाव-केरसाने गावांचा संपर्क तुटला

Share

वीरगाव | वार्ताहर

बागलाण तालुक्यातील दसाणे-केरसाणे गावाला जाणाऱ्या कान्हेरी नदीवरील पूल पुराच्या पाण्याने तुटल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. पर्यायी मार्ग म्हणून गावकऱ्यांना ५-७ किमी अंतराचा फेरा घेऊन गाव गाठावे लागत आहे.

गेल्या पाच ते सात दिवसांपासून पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील सर्व लहान मोठे बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत.

दसाणा लघुमध्यम प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरून मोठ्या प्रमाणात पाणी या भागातुन वाहणाऱ्या कान्हेरी नदीला आले. पाणी मोठ्या प्रमाणात आल्यामुळे कान्हेरी नदीवर विरगांव पाडे या गावाजवळ दसाणा केरसाणा या गावांना जाण्यासाठी पुल बांधण्यात आला होता.

नदीला आलेल्या पाण्यामुळे पूल खचला. पुलाचा दक्षिकडील भाग हा पुर्ण पणे भराव वाहुन गेल्याने पुर्ण मोकळा झालेला आहे. इतर भागातही माती खचली असुन मोठ्या प्रमाणात जमिनीला मोठ मोठे तडे पडले आहेत.

हा पुल तुटल्यामुळे पश्चिमेला सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या दसाणा व केरसाणे या गावांचा संपर्क पुर्णपणे तुटला आहे. पुलावरून मोठ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

पुल तुटल्याने या भागातील नागरिकांना शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी चार ते पाच किलोमीटर असलेल्या मुंगसे रस्त्यावरुन फिरुन जावे लागत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!