श्रीलंका विरुद्ध कोहलीचा डबल धमाका

0
नागपूर | येथील कसोटीवर भारताने पकड  मजबूत केली आहे. कर्णधार विराट कोहलीने आज द्विशतक झळकावत भारताला पाचशे धावांचा पल्ला पार करून दिला. विशेष म्हणजे आजची कोहलीचे पाचवे द्विशतक होते. २१३ धावा करत कोहली बाद झाला.

कोहलीने आंतरराष्ट्रीय करिअरमधील ५१ वे शतक आज झळकावले. विराटने १३० चेंडूत १० चौकार लगावत शतक झळकावले. कर्णधार म्हणून सर्वाधिक ११ सेंच्युरी सुनील गावस्कर यांच्या नावावर होत्या.

गावस्करांच्या या रेकॉर्डची बरोबरी विराटने कोलकाता टेस्ट मॅचमध्ये केली होती. मात्र, आता नागपूर टेस्ट मॅचमध्ये पुन्हा एक सेंच्युरी लगावत विराटने गावस्करांनाही मागे टाकले आहे.

कोहलीने आजचे द्विशतक झळकावत कर्णधार म्हणून सर्वाधिक द्विशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. त्याने वेस्ट इंडीजच्या कर्णधार ब्रायन लाराच्या विक्रमाची बरोबरी केली.

मागील द्विशतक कोहलीने याच वर्षी फेब्रुवारीत बांग्लादेश विरुद्ध झळकावले होते.

LEAVE A REPLY

*