Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच क्रीडा मुख्य बातम्या

ICC Cricket World Cup : विराट, विल्यम्सन ११ वर्षांनंतर पुन्हा एकदा आमने सामने; कोण मारणार बाजी?

Share

मँचेस्टर | वृत्तसंस्था

उपांत्यफेरीच्या सामन्यात  4 संघ निश्चित झाले असून या स्पर्धेत पहिला सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. उद्या हा सामना रंगणार असून पुन्हा एकदा विराट आणि केन विल्यम्सनच्या कप्तानीत खेळणार आहेत. विशेष म्हणजे दोघेही 11 वर्षांपूर्वी 2008 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भिडले होते. तेव्हाही दोघे आपआपल्या देशाचे नेतृत्व करत होते.

अवघ्या क्रिकेट रसिकांचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. उद्या   9 जुलैला हा सामना खेळवला जाणार आहे.  2008 मध्ये झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलला भारत आणि न्यूझीलंड सेमीफायनलला पोहचले होते. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करत भारताला 205 धावांचे आव्हान दिले होते.

या सामन्यात विराटने गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी करत 7 षटकांत 27 धावा देत 2 बळी घेतले होते. भारताने तेव्हा सेमीफायनलच नाही तर फायनलमध्ये आफ्रिकेला पराभूत करून अंडर 19 वर्ल्ड कपही जिंकला होता.

त्यावेळी सेमीफायनलच्या सामन्यात पावसामुळे भारताला 43 षटकांत 191 धावांचे आव्हान मिळाले होते. भारताकडून श्रीवत्स गोस्वामीने 51 आणि कोहलीने 43 धावा चोपल्या होत्या.

भारताने हा सामना 9 चेंडू आणि 3 गडी राखून जिंकला होता. विराटच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला होता. 2008 मध्ये फक्त विराट आणि विल्यम्सन आमनेसामने नव्हते तर रविंद्र जडेजासुद्धा त्या संघात होता.

तर न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट आणि टिम साउथी अंडर 19 वर्ल्ड कप खेळत होता. आता 11 वर्षांनी हे खेळाडू पुन्हा सेमीफायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्यामुळे क्रिकेटरसिकांना उद्याच्या सामन्याची उत्सुकता लागून आहे.

वर्ल्ड कप 2019 मध्ये भारताने साखळी फेरीत फक्त एक सामना गमावला आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडचा तीन सामन्यात पराभव झाला आहे. दोन्हीही संघांचे पारडे जड असले तरी भारतीय संघ कमालीचा फॉर्मात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!