विराट-अनुष्काच्या लग्नात दूतावासाचे विघ्न

0
नवी दिल्ली – माणसाची एक चूक माणसाला मोठी शिक्षा देत असते. एका चुकीने अनेकांचे नुकसान झालेले आहे. तशीच चूक विराट कोहलीची झाली आहे. परदेशात लग्न करताना प्रत्येक भारतीय नागरिकाला तेथील दूतावासाला याची माहिती देणे गरजेचे आहे.
परंतु विराटला लग्नाच्या गडबडीत हे लक्षात आले नाही. त्याच्या या चुकीची त्याला मोठी शिक्षा भोगावी लागणार असून विराटला पुन्हा एकदा लग्न करावे लागू शकते. ‘विराटचे लग्न त्यात दूतावासाचे विघ्न’ अशा पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या लग्नाची मागील दोन वर्षांपासून चांगलीच चर्चा झाली. यामध्ये 2017 वर्षात विराटचे लग्न झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत होती. परंतु त्याला मात्र विराटकडून दुजोरा मिळाला नाही. अखेर त्याने डिसेंबर 2017 मध्ये लग्न केले व त्यानंतर त्याच्या लग्ननाविषयीच्या वावड्या उठणे बंद झाले.
11 डिसेंबर 2017 रोजी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबद्ध झाले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला. विराटने राजधानी रोममध्ये असलेल्या भारतीय दुतावासाला याची कोणतीही सूचना दिली नाही. त्यामुळे लग्नाच्या नोंदणीमध्ये अडचण होण्याची शक्यता आहे.
विराट व अनुष्का लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतरही विराटच्या चाहत्यांनी त्यावर टीका टिपन्नी केली.
विराटने इटलीमध्ये केलेल्या लग्नाची माहिती पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे वकील हेंत कुमार यांनी 13 डिसेंबर रोजी रोम येथील भारतीय दुतावासातून आरटीआयच्या माध्यमांतून मागविली आहे. त्यामध्ये विरुष्काने इटलीमध्ये लग्न करत असल्याचे रोममधील भारतीय दुतावासाला कळवले नाही, असे या माहिती अधिकारात उघड झालेले आहे.
नियमानुसार, एखादी भारतीय व्यक्ती जर दुसर्‍या देशामध्ये लग्न करत असेल तर परदेशी विवाह अधिनियम 1969 नुसार तेथील भारतीय दुतावासाला याबाबत माहिती द्यावी लागते. त्यानुसार ती माहिती रजिस्टर्ड केली जाते. पण विराट व अनुष्कांचे लग्न या नियामानुसार झालेच नाही. आता विराट कोहली आणि अनुष्का भारतात जिथे कुठे राहणार असतील.
त्या राज्याच्या नियमानुसार त्यांना विवाह नोंदणी करत पुन्हा एकदा लग्न करावे लागेल. नाही तर ते लग्न ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे विराटच्या लग्नात विघ्न आलेले आहे. यामुळे विराट चाहत्यांनी पुन्हा एकदा विराटच्या लग्नाच्या बाबीवर सोशल मीडियावर विडंबन सुरु केले आहे. विराट पुन्हा बोहल्यावर उभा राहिलेले छायाचित्र तयार करून त्याखाली वेगवेगळा मजकूर टाकून अशा पोस्ट सोशलवर व्हायरल केल्या जात आहेत. विराट पुन्हा कोठे लग्न करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*