विराट- अनुष्काच्या लग्नाची बातमी खोटी : अनुष्काच्या प्रवक्त्याने केले स्पष्ट

0

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लग्न करणार असल्याची चर्चा बुधवारी वाऱ्यासारखी भारतभर पसरली.

येत्या 9 ते 12 डिसेंबर दरम्यान हे दोघे विवाह बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते.

एवढेच काय तर इटलीमध्ये ते हिंदू पद्धतीने लग्न करत असल्याचीही वार्ता येत होती.

या बातमीमुळे विराट आणि अनुष्काचे चाहते खूश होतात न होतात तोच त्यांच्या लग्नाची बातमी खोटी असल्याचे वृत्त समोर आले आहे.

अनुष्काच्या प्रवक्त्याने विराट आणि अनुष्का इटलीमध्ये लग्न करत नसल्याचे म्हटले. अनेक वृत्त वाहिन्यांवर या दोघांच्या लग्नाची तारीख समोर आल्यामुळेच त्यांना हे विधान देणे गरजेचे पडले.

LEAVE A REPLY

*