VIRAL : आवडत्या कलाकारासारखे दिसण्यासाठी 50 वेळा केली सर्जरी, पण झालं काहीतरी वेगळच!

0

आपल्या आवडत्या कलाकारासारखे दिसण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्या आवडत्या कलाकारासारखे कपडे, तसा लूक करण्यासाठी अनेकजण खूप धडपड करतात.

इराणमधील एका तरूणीने आवडत्या फिल्मस्टारसारखे दिसण्यासाठी तब्बल 50 वेळा सर्जरी केली. विशेष म्हणजे एवढ्या वेळा सर्जरी केल्यामुळे चेहरा विद्रूप होण्याची वेळही या मुलीवर आली आहे.

हॉलिवूड स्टार अँजेलिना जोलीसारखे दिसण्यासाठी या मुलीने 50 हून अधिक सर्जरी केल्या.
इतक्या सर्जरी करून ती काही अँजेलिनासारखी दिसलीच नाही, पण तिचा चेहरा मात्र विद्रुप झाला आहे. ‘डेली मेल’ने दिलेल्या माहितीनुसार तिचं नाव सहार तबार आहे. ती 22 वर्षांची आहे.
अँजेलिना जोलीची ती चाहती आहे, म्हणूनच तिच्यासारखे दिसण्यासाठी तिने लाखो रुपये खर्च केले आहेत. पण काहींच्या मते तिचे हे रुप सर्जरीचा परिणाम नसून मेकअपची कमाल असल्याचं म्हटले जात आहे.

सहारच्या फोटोवर अनेकांनी कमेन्ट केल्या आहेत. काहींनी तिचा हा लूक सकारात्मकपणे घेतला तर काहींनी तिच्यावर टीकाही केली आहे.

LEAVE A REPLY

*