Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : खा. डॉ. पवार यांचा लोकसभेत मराठी बाणा; महिला खासदारांकडून टिंगल

Share

नाशिक | प्रतिनिधी

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी लोकसभेत मराठी बाणा दाखवत मतदार संघाच्या समस्या मराठीत मांडल्या. मात्र, यावेळी भाजपच्या महिला खासदार डॉ. प्रीतम मुंडे  व रक्षा खडसे या त्यांच्या मागच्या बाकावर बसल्या होत्या.  डॉ. पवार यांच्या भाषणाच्या वेळी मागे जोरजोरात हसत असल्याचे एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

खासदार डॉ. मुंडे आणि खडसे यांची लोकसभेतील ही दुसरी टर्म आहे. तर खासदार डॉ. पवार ह्या पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.

अनुभवी खासदारांकडून नव्या लोकप्रतिनिधीला पाठिंब्याची गरज असताना या दोघी मात्र, तसे न करता जोरजोरात हसत असल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

काल (दि.१८)  खा. डॉ. पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने कांदा, डाळिंब, द्राक्ष असेल, टोमॅटो, मका अशी पिकें घेतली जातात. यासाठी जास्तीत जास्त प्रोसेसिंग युनिट मिळावेत, कोल्ड स्टोरेज मिळावेत, रेल्वे वॅगनची व कार्गो सेवेची उपलब्धता वाढावी, कांद्याला २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव मिळावा.

तसेच नियोजित निफाड तालुक्याील ड्रायपोर्टचे काम सुरु करण्यात यावे. ग्रामीण भागामध्ये गाव स्तरावर बेसिक डाटा उपलब्ध करण्यात यावा. सातबाराचा संगणकीकृत प्रक्रियाही जलद गतीने करण्यात यावी. विजेच्या समस्येवर मात करण्यासाठी सोलार प्रोजेक्ट जास्तीत जास्त देणे गरजेचे असल्याचे प्रश्नाद्वारे सांगितले.

सध्या हा व्हिडीओ समाजमाध्यमांत चांगलाच व्हायरल झाला आहे.  दोन्हीही महिला खासदारांवर टीकेची झोड उठली आहे. अनेक नेटकरी तिखट प्रतिक्रिया  व्यक्त करताना दिसत आहेत.

सोशल मीडियात व्हायरल झालेला व्हिडीओ 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!