Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

Viral Video : अबब.. 11 हजार पदांसाठी 17 लाख अर्ज

Share

नवी दिल्ली :

बिहारमध्ये पोलीस कॉनस्टेबल पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली होती. यात सुमारे 17 लाख उमेदवारांनी 11 हजार 800 पदांसाठी अर्ज केले होते. परीक्षेच्या दिवसाशी निगडीत असलेला व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये पोलिस कॉन्स्टेबलची परीक्षा देवून परतलेले तरुण रेल्वेमध्ये चढताना दिसत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे अनेक तरुण रेल्वेच्या आत उभे न राहता रेल्वेच्या गेट व इंजिनवर उभे आहे. परीक्षेहून परत आलेल्या लोकांची गर्दी इतकी होती की त्या तरुणांना ट्रेनमध्ये उभे राहण्यास जागा मिळाली नाही.

‘मसान’ चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज घेवणे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. नीरज घेवनेंंच्या या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधले आहे, त्याचप्रमाणे अनेक लोक या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया देखील देत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!