Type to search

Featured मुख्य बातम्या

Video: पक्षी आहे की ससा? ओळखा पाहू

Share

वृत्तसंस्था:

सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्याला असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडिओ पाहून तुम्ही देखील विचारात पडाल कि, नक्की हा पक्षी आहे के ससा?


पहिल्यांदा व्हिडिओ पाहिल्यावर वाटते कि,  ती व्यक्ती कावळ्या सारख्या दिसणाऱ्या पक्षाच्या डोक्यावर हात फिरवत आहे. परंतु लक्षपूर्वक व्हिडीओ पाहिला असता लक्षात येईल की, तो कावळा नसून काळ्या रंगाचा ससा आहे.

सशाने आपल्या कानांना अशाप्रकारे वरती केले आहे की, जसे ती पक्ष्याची चोचच आहे. नॉर्वेच्या ओस्लो विश्वविद्यालयातील एक संशोधक डँन क्विंटानाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. ट्विटरवर पोस्ट करताना त्याने लिहिले की, सशाला प्रेमाने नाकावर हात फिरवत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 11 लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितले आहे. तर 15 हजार पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!