Viral Video : गटारीत हात घालताच सापडले जिवंत बाळ

0

नाशिक, ता. : भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र उत्साहाने साजरा होत होता, त्याचवेळची ही घटना हृदय हेलवणारी आहे.

तमिळनाडू येथील एका शहरात सकाळी दुधवाल्याने गीता नावाच्या महिलेला गटारीतून रडण्याचा आवाज येत असल्याचे सांगितले.

आवाजाच्या दिशेने गीता गेल्या. त्यांना वाटले की एखादे मांजराचे पिलू पुरामुळे अडकले असेल. त्यामुळे त्यांनी त्याला सोडविण्यासाठी आत हात घातला, तेव्हा त्यांना धक्काच बसला.

ते होते नुकतेच जन्माला आलेले बाळ. बाळाच्या गळ्याला नाळ गुंडाळली गेल्यामुळे ते रडत होते. त्यांनी मग ती नाळ सोडवून त्याला सुखरूप बाहेर काढले. त्याला स्वच्छ केले.

पण बाळाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळाला जीवदान मिळाले.

हे सर्व माणुसकीच्या नात्याने करणाऱ्या गीता म्हणाल्या ‘बाळाला आता जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे’. त्या बाळाला दत्तक घेणार आहेत. त्याचे नावही त्यांनी सुथांथिरम म्हणजेच ‘स्वातंत्र्य’ असे ठेवले आहे.

सध्या बाळ काचेच्या पेटीत असून सुखरूप आहे. एका आईने जन्म दिलेल्या या बाळाला गीता नावाच्या या आईने खऱ्या अर्थाने पुनर्जन्म दिला आणि माणुसकीलाही.

या बाळाचा जो व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. तो पुढे देत आहोत.

LEAVE A REPLY

*