…म्हणून या नाशिककर शिक्षकाने रस्त्यावर केले ‘संबळ नृत्य’; पाहा व्हिडिओ

0
नाशिक | पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपची लाट मोडून काढत सत्ता परिवर्तनास सुरुवात झाली आहे. यामुळे आनंदी झालेल्या नाशिकमधील एका शिक्षकाने संबळ नृत्यावर थिरकत युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

अवघ्या बावीस तासांत या अडीच हजारापेक्षा अधिक युजर्सने हा व्हिडीओ बघितला आहे. तर अनेकांनी प्रतिक्रियादेखील कमेंट आणि इमोजीच्या माध्यमातून याठिकाणी व्यक्त केल्या आहेत.

सचिन अहिरे असे या शिक्षकाचे नाव आहे. नाशिकमधील वाहतूक समस्या असो, कचऱ्याचा प्रश्न असो त्यांनी आंदोलन उभारून समस्या सोडविल्या आहेत.

सोशल मिडीयावर नियमित अपडेट राहून ते वेळोवेळी काही पोस्ट अपडेट करत राहतात. त्यांच्या असंख्य पोस्टला मोठा प्रतिसाद देखील मिळत असतो.

गेल्या चार वर्षांपासून देशात भाजप सरकारची लाट आहे. या लाटेत अनेकांना विजयश्री प्राप्त झाली आहे. मात्र, सध्या देशातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसतोय, अनेक ठिकाणी बाजारभावाला मातीमोल मोबदला मिळत आहे. त्यामुळे हैराण झालेल्या देशवासीयांनी नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले.

या सत्तापरिवर्तनाचे पडसाद नाशिकमध्येही उमटले आहेत. अहिरे सर यांनी फेसबुकवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये ‘देशात बदल घडायला सुरवात, ‘मिशन निवडणूक’ ५ राज्य निकाल सत्र थेट नाशिकमधून सचिन अहिरे सर. अशा आशयाची पोस्ट लिहून त्यासोबत संबळ नृत्याचा एका व्हिडीओ त्यांनी अपलोड केला आहे.

फेसबुकची लिंक आणि हा व्हिडीओ अनेक नेटकरयांनी सोशल मीडियात व्हायरल केला असून नाशिकमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.

LEAVE A REPLY

*