Type to search

मध्यप्रदेशमध्ये वीरगाव येथील वाकचौरे कुटूंबियाचा अपघात

Featured आवर्जून वाचाच सार्वमत

मध्यप्रदेशमध्ये वीरगाव येथील वाकचौरे कुटूंबियाचा अपघात

Share

एकाच कुटूंबातील चौघे ठार; एक जखमी

वीरगाव(वार्ताहर)- अकोले तालुक्यातील वीरगावच्या एकाच कुटूंबातील चौघांचा मध्यप्रदेशात झालेल्या कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. वीरगाव येथील भगवान भागवत वाकचौरे(वय48वर्षे), त्यांची पत्नी सौ.वंदना भगवान वाकचौरे (वय45वर्षे), त्यांची मुलगी तनुजा भगवान वाकचौरे(वय 18 वर्षे) आणि पुतण्या संकेत चंद्रकांत वाकचौरे (वय26 वर्षे) या चौघांचा या अपघातात मृत्यू झाला. त्यांचा मुलगा पियुष भगवान वाकचौरे(वय 15 वर्षे) हा जखमी झाला आहे.

मध्यप्रदेशातील टेम्हला गावाजवळ ठिकरी जि. बडवानी या पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात झाला. आज गुरुवारी पहाटे 4.20 वाजता मुंबई-आग्रा हायवे वर हा अपघात झाला. वाकचौरे कुटुंबिय जेजूरीच्या खंडोबा दर्शनानंतर मध्यप्रदेशातील धार येथील देवीच्या दर्शनाला निघाले होते. भगवान वाकचौरे हे पेठ सुरगाणा येथे शिक्षणविस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. या अपघाताने वीरगावात शोककळा पसरली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!