गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा खपवून घेतली जाणार नाही..

नरेंद्र मोदी झाले भावूक

0

अहमदाबाद : देशात तीन वर्षांपासून गोरक्षणाच्या नावाखाली जे काही चालले आहे. त्याबाबत आज पंतप्रधान नरेंद मोदी

यांनी  पहिल्यांदा मौन सोडले आहे.

गोरक्षणाच्या नावाखाली देशात सुरु असलेल्या हिंसेमुळे मी खूप दु:खी असल्याचे मोदिनी बोलून दाखविले. हे सांगत असताना मोदी भावूक झाले होते.

त्याबरोबरच हिंसाचार घडवून आणणाऱ्याना मोदींना सल्ला देखिल दिला आहे. ‘या गोरक्षकांनी महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या आयुष्यातून बोध घ्यायला हवा’.

आज महात्मा गांधी, विनोबा भावे असते तर त्यांनी अशा गोरक्षणाचा विरोध केला असता.

जर कोणीही कायदा हातात घेऊन चुकीचे काम करत असेल, तर त्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असे मोदींना ठणकावले.

गुजरातमधील साबरमती आश्रमाच्या 100 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते.

 

LEAVE A REPLY

*