शबरीमला : केरळ पेटलं; ८६ गाड्यांची तोडफोड, पोलिसांसह महिलांवरही हल्ले

0

तिरुवनंतपूरम : शबरीमला मंदिरात काल दोन महिलांनी प्रवेश केल्यावरून हिंदू संघटनांनी आज बंद पुकारला आहे. या बंदचे राज्यभरात पडसाद उमटले असून बससेवेला मोठा फटका बसला आहे. तसेच बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद करण्यात आली आहेत. मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून बुधवारी झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या एका व्यक्तीचा आज मृत्यू झाला आहे.

चंद्रन उन्नीथान (वय ५५) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ते सीपीआय आणि भाजप कार्यकर्ते यांच्यामधील दगडफेकीत गंभीर जखमी झाले होते. ते शबरीमला कर्मा समिती या कर्मठ संघटनेचे सदस्य होते. सीपीआय कार्यालयाजवळ झालेल्या दगडफेकीत डोक्यात दगड लागून ते गंभीर जखमी झाले होते. आज  रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस त्यांच्या मृत्यूची चौकशी करत आहेत.

LEAVE A REPLY

*