उत्तर प्रदेश : बहुजन समाज पक्षाच्या विधानसभा उमेदवाराची हत्या; संतप्त समर्थकांनी बस पेटवली

0
बहुजन समाज पक्षाचे राजेश यादव यांची सोमवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत यादव हे बसपाचे उमेदवार होते.
सोमवारी रात्री यादव त्यांच्या कारने अलाहाबाद विद्यापीठातील ताराचंद होस्टलमध्ये गेले होते. यावेळी त्यांचे मित्र डॉ. मुकुल सिंह हेही त्यांच्यासोबत होते. राजेश यादव यांच्या पत्नीने डॉ. मुकुल सिंह यांच्यावरच हत्येचा आरोप केला आहे.
दुसरीकडे मंगळवार सकाळपासून राजेश यांच्या संतप्त समर्थकांनी इंडियन प्रेस चौक आणि पन्नालाल रोडवर रास्तारोको सुरु केला आहे. एक बस पेटवून देण्यात आली आहे.
पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

*