Type to search

आवर्जून वाचाच हिट-चाट

विनोद मेहरा यांच्या मुलीचा बोल्ड आणि हॉट अंदाज

Share

मुंबई : बॉलिवूड चित्रपटांत अभिनयाने सिनेरसिकांची मने जिंकणारे अभिनेते विनोद मेहरा यांनी आपल्‍या चित्रपट करिअरमध्‍ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. प्रेक्षकांनी स्‍वीकारलेल्‍या या अभिनेत्‍याने आपल्‍या दमदार अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. परंतु, खुप कमी वयात त्‍यांना जग सोडावं लागलं, आज त्‍यांची पुण्‍यतिथी. ३० ऑक्‍टोबर १९९० रोजी हार्ट अॅटॅकने त्‍यांचं निधन झालं होतं. त्‍यावेळी त्‍यांची मुलगी सोनिया मेहरा २ वर्षांची होती. २ डिसेंबर १९८८ ला जन्‍मलेली सोनिया, विनोद आणि त्‍यांची तिसरी पत्नी किरण यांची मुलगी आहे.

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सोनियानंसुद्धा अभिनयाच्या क्षेत्रात एंट्री मारली. रुपेरी पडद्यासह छोट्या पडद्यावरही सोनियाने आपली जादू दाखवली. रुपेरी पडद्यावर सोनियाचे अखेरचे,दर्शन २०१४ साली आलेल्या ‘रागिनी एमएमएस-२’ या सिनेमात झाले. या सिनेमात तिने तान्या कपूर ही भूमिका साकारली होती. याशिवाय एमटीव्हीवरील विविध शोमध्येसुद्धा ती झळकली आहे. एमटीव्ही ग्राइंड, एमटीव्ही न्यूज आणि एमटीव्ही स्टाइल चेक अशा शोमध्ये व्हीजे म्हणून तिने काम केले आहे. सोनियाची स्टाइल आणि अदा कुणालाही घायाळ करतील अशाच म्हणाव्या लागतील. तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज यावर रसिक फिदा आहेत.

सोनियाचं शिक्षण केन्या आणि लंडनमध्‍ये झालं. सोनियाने ८ वर्षांची असताना अभिनयाचे धडे घेतले. या दरम्‍यान, लंडन ॲकॅडमी ऑफ म्युझिक ॲण्‍ड ड्रामॅटिक आर्ट्सच्‍या ॲक्टिंग एग्‍झामिनेशनमध्‍ये तिला गोल्ड मेडल देखील मिळाले होते. १७ वर्षांची असताना ती मुंबईत आली. आणि अनुपम खेर यांच्‍या ॲक्टर प्रीपेयर्स इन्‍स्‍टिट्यूटमधून ३ महिन्‍यांचा कोर्स केला.  सोनियाने २००७ मध्‍ये दिग्‍दर्शक अनंत महादेवन यांचा चित्रपट ‘व्‍हिक्टोरिया नं. २०३’मधून बॉलिवूड डेब्यू केलं होतं. या चित्रपटात सोनियासोबत अनुपम खेर, ओम पुरी, जिमी शेरगिल आणि जॉनी लीवर यांच्‍या मुख्‍य भूमिका होत्‍या. सोनियाने आतापर्यंत ४ चित्रपटात काम केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!