श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात उद्या विमानोत्सव
Share

नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमधील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात उद्या सकाळी श्रींचा जन्मोत्सव साजरी करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता श्रींना झोपाळ्यात विराजमान करून धावा म्हटला जाणार आहे. विमानोत्सावाच्या कार्यक्रमास नाशिकमधील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कापड पेठ येथील बालाजी मंदिर ट्रस्टकडून करण्यात आले आहे.
श्री. व्यंकटेश बालाजी मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विमानोत्सवदेखील या कार्यक्रमातील एक भाग आहे. श्रींचे पूर्वज गणपती महाराज यांना ताम्रपर्णी नदीमध्ये देवाची प्रार्थना करताना ही मूर्ती प्राप्त झाली. तो दिवस होता भाद्रपद वद्य एकादशीचा.
तेव्हा देव त्या काळातील विमानाने प्रकट झाले अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून श्रींच्या या उत्सवाला विमानोत्सव संबोधले जाते. विमानोत्सवाचा दिवशी मोठ्या संख्येने भाविकंच्या उपस्थितीत श्रींना झोपळ्यात विराजमान करून धावा म्हटला जातो.