विळवंडीतील खुन अनैतिक सबंधातून; गुन्हे शाखेकडून उलगडा, संशयित प्रियकर जेरबंद

0
नाशिक । दिडोंरी तालुक्यातील विळवंडी येथे झालेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात ग्रामिण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. हा खून अनैतिक सबंधातून प्रियकरानेच केल्याचे तपासातून समोर आले असून त्यास अटक करण्यात आली आहे.

कृष्णा केरू लिलके (25, रा. कोचरगाव, ता.दिंडोरी) असे संशयीत प्रियकराचे नाव आहे. 12 नोव्हेंबरला दिंडोरी पोलीस ठाणे हद्यीत विळवंडी शिवारातील पुंडलीक वाघेरे यांचे शेेतात आंब्याच्या झाडाखाली एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

महिलेच्या तोंडावर व कपाळावर गंभीर दुखापत करण्यात आली होती. यामुळे तीचा चेहरा ओळखू येत नव्हता या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. महिलेचा मृतदेह कुझलेल्या अवस्थेत असल्याने वैद्यकिय अधिकार्‍यांनी जागेवरच शवविच्छेदन केल होते. शवविच्छेदन अहवालावरून या महिलेस लाकडी दांडके, दगडाने डोक्यावर व कपाळावर मारून गंभीर मारून जिवे ठार मारल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणाची दखल घेत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांनी मारेकर्‍यांचा शोध घेण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिले होते. याचा तपास करताना मयत महिलेचे वर्णनावरून ती कोचरगाव येथील मंदाबाई रानु लिलके (41) असल्याचे निष्पन्न झाले.

यादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार 7 आक्टोबर रोजी मंदाबाई या कोचरगाव येथुन विळवंडी येथे बाजरी विक्री करण्यासाठी गेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवुन कोचरगाव येथे राहणारा कृष्णा केरू लिलके यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मंदाबाईच्या खुनाची कबुली दिली.

त्याचे व मयत मंदाबाई रानु लिलके यांचे 5 वर्षापासुन प्रेम संबंध होते. कृष्णा लिलके 2 महिन्यांपासुन त्याचे कुटूंबियांसोबत शेतीच्या कामासाठी चांदवड तालुक्यात गेला होता. दरम्यानच्या काळात मंदाबाईचे इतर लोकांशी अनैतिक संबंध असल्याची माहिती त्याला समजल्याने त्यांच्यात वाद झाले होते.

7 ऑक्टोबर रोजी तो कोचरगाव येथे परत आला व त्याच रात्री विळवंडी येथे मंदाबाई लिलके हिस भेटला होता. तेथुन रात्री ते दोघे सोबत कोचरगाव येथे रस्त्याने जात असतांना संशयिताने तिच्या इतर संबंधांचा जाब विचारला असता त्यांच्यात पुन्हा वाद झाले या वादात रागाच्या भरात कृष्णा याने आंब्याचे झाडाखाली बाजुस पडललेला लाकडी दांडा तिचे डोक्यावर मारला तसेच मोठा दगड उचलुन तिचे डोक्यात मारून तिचा खून केला असी कबुली त्याने दिली असल्याचे करपे यांनी सांगीतले.

कृष्णा लिलके यास अटक करण्यात आली असून त्यावर दिंडोरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाक पोलीस निरीक्षक आशिष अडसुळ, मच्छिंद्र रणमाळे, रामभाऊ मुंढे, पोहवा दिपक आहिरे, दत्तात्रय साबळे, पुंडलीक राऊत, हनुमंत महाले, सुधाकर खरोले, गणेश वराडे, वसंत खांडवी, अमोल घुगे, जालिंदर खराटे, पोकॉ प्रदिप बहिरम, विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, संदिप लगड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

LEAVE A REPLY

*