स्थानिकांना टोल माफी द्या; टोल विरोधी कृती समितीची निदर्शने

0
नाशिक ।  सिन्नर-नाशिक रस्त्यावर शिंदेनजीक टोल नाक्यावर टोल आकारणी सुरू करण्यात आल्याने स्थानिकांना या टोलमधून वगळण्यात यावे, नागरी वसाहतीतून हा टोल हलविण्यात यावा यासह विविध मागण्यासांठी टोल विरोधी कृती समिती शिंदे पंचक्रोशीच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येउन निवेदन देण्यात आले.

टोल आकारणी केंद्र असलेले शिंदे गाव, बंगाली बाबा मंदिराजवळील पुलाचे काम तसेच चेहडीपासून पुढे नाशिकपर्यंतचे काम अपूर्ण असल्याने टोलवर शुल्क आकारणी कशी सुरू केली, असा सवाल कृती समितीने केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या टोलमुळे शिंदे तसेच परिसरातील अर्धा ते 1 किलोमीटर परिसरातील पळसे, मोहू, चिंचोली, चांदगिरी, जाखोरी, वडगाव, कोटमगाव, हिंगणवेढे येथील वाहने दररोज येथून ये-जा करतात. मात्र जर प्रत्येकवेळी येथे टोल भरायचा असेल तर मग जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे टोल परिसरातील 10 किलोमीटर परिघात टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

नागरी वस्तीत टोलनाका सुरू केल्याने नागरीकांची मोठी कुचंबना होत असून गावालगत शेती तसेच घरकामासाठी व्यावसायिक , खाजगी वाहने घेउन जाउ शकत नाही. लगतच्या गावाचे अंतर लक्षात घेता टोल आकारणे योग्य नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही लक्ष येथे दिले गेले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

चिंचोली, मोहू येथे जाण्यासाठी रस्ता पंक्चर केला मात्र येथे सिग्नल यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. सर्व्हिस रोड नाही त्यामूळे जीव मुठीत धरून नागरीकांना प्रवास करावा लागतो. टोल नाका परिसरातील दहा किलोमीटर परिघातील गावांना टोल वसूलीतून वगळण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी ज्ञानेश्वर जाधव, गणेश घनदाट, सोमनाथ भिसे, संतोष गायधनी, युवराज जगळे, देवीदास झाडे, सुदाम बोडके, युवराज जगळे, योगेश टिळे, गणेश धात्रक आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

शिंदे टोलनाक्याविरोधात ग्रामस्थांची एकजूट; आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

LEAVE A REPLY

*