दिंडोरीचे आमदार झिरवाळ यांना ग्रामस्थांनी कोंडले; काय आहे राजकारण…?

0
दिंडोरी : मांजरपाडा प्रकल्पात जमिनींचा मोबदला पुरेसा न मिळाल्यामुळे आज देवसाने येथील ग्रामस्थांनी दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांना मंदिरात कोंडून ठेवल्याने दिंडोरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

मांजरपाडा प्रकल्प देवसाने गावात होत आहे. सर्वाधिक जमिनी या देवसानेतील शेतकऱ्यांच्या गेल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पाला देवसानेचे नाव द्या अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लघुपाटबंधारे विभागाकडून पाणी आरक्षित करण्यात येणार होते मात्र अद्याप ते झाले नाही त्यामुळे परिसरात दुष्काळ शमण्याचे नाव घेत नाही.

हातात होत्या तेवढ्या जमिनी प्रकाल्पसाठीत दिल्या आहेत. आज बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ आल्याचेही संतप्त ग्रामस्थांनी म्हंटले आहे.

मांजरपाडा महत्वकांक्षी वळण योजनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील गुजरातच्या हद्दीवरील पाणलोट क्षेत्रातील पश्चिमवाहिनी नद्यांचे गुजरातकडे आणि अरबी समुद्रात वाहून जाणारे ८४५ दलघफु पाणी अडवुन हे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार आहे.

यातील १०० दलघफु पाणी स्थानिक वापरसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते मात्र यावर लघुपाटबंधारे अधिकारी फक्त बघ्यांची भूमिका घेत आहेत.

त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांना ग्रामदेवतेच्या मंदिरात कोंडून ठेवत जमिनींचा मोबदला द्यावा, आरक्षित करण्यात आलेल्या पाण्याची हमी द्यावी.

मांजरपाडा प्रकल्पाचे नाव देवसाने गावाच्या नावावरून देण्यात यावे. यासाठी विधानसभेत प्रश्न प्रखरतेने मांडावेत यासाठी आमदार झिरवाळ यांना कोंडून ठेवत ग्रामस्थांनी लक्ष वेधले.

LEAVE A REPLY

*