Type to search

ब्लॉग सार्वमत

गाव जत्रांचे बदलते स्वरुप…

Share
ग्रामदैवताचा वार्षिक यात्रोत्सव हा ग्रामीण माणसाच्या श्रध्देचा, जिव्हाळ्याचा आणि तितकाच आवडीचा विषय. हा यात्रोत्सव म्हणजे गावाकडिल अबालवृध्दांसाठी पर्वणीच.पण अलिकडच्या काही वर्षांत या गाव जत्रांचे स्वरुप बदलत आहे नव्हे काळानुरुप काही बदल अपरिहार्यपणे स्विकारणे भाग पडले आहे.

गावची जत्रा म्हटली की गोडिशेव,रेवडीचा आस्वाद घेत लोकनाट्य तमाशा, कुस्त्यांचा हगामा, टांगा शर्यती, दशावतारी खेळ आणि आणखी बरेच काही मनमुरादपणे अनुभवण्याचे दिवस अशी एकंदर परिस्थिती होती.आज हे चित्र मोठ्या प्रमाणात बदलेले दिसते. हलवायाच्या दुकानांमध्ये गोडिशेव-रेवडी दिसत असली तरी ग्रामीण तरुणांचाही कल कचोरी रगडा, पाणी पुरी, चायनीज फूड याकडे वळालेला आहे हे यात्रांतील हातगाड्यांच्या गर्दीवरून प्रकर्षाने जाणवते. हॉटेलिंगचे पेवही ग्रामीण भागापर्यंत पसरले, त्यातूनच यात्रा काळात स्थानिक हॉटेलांमध्ये पार्ट्यांसाठी हल्ली गर्दी दिसू लागली आहे.

लोकनाट्य तमाशा ही लोककलाही आता नावापुरतीच उरली असून गण, गौळण, बतावणी, रंगबाजी याला जवळजवळ तमाशातून फाटाच दिला की काय? असा प्रश्‍न पडतो. केवळ हिंदी-मराठी गाण्यांची मैफल आणि त्यावर मनसोक्त थिरकणारी तरुणाई हेच तमाशाचे स्वरुप झाले आहे. भारुड-भजन आणि दशावतारी खेळांची जागा आर्केस्ट्राने घेतली आहे.टांगा शर्यतीवर शासनानेच बंदी आणल्याने हा खेळ तर नामशेष झाल्यातच जमा आहे.इनामी कुस्त्या अजून बर्‍यापैकी तग धरून असून आता तर काही ठिकाणी महिला मल्लांच्याही कुस्त्या होऊ लागल्या आहेत.

यात्रेतील मिरवणुकीत दिसणार्‍या सनई चौघडे, ढोली बाजा या पारंपरीक वाद्यांची जागा आता डिजीटल साउंड सिस्टीमने घेतली आहे. शोभेच्या दारूकामातही नवनवीन प्रकार येत आहेत. खरं तर वर्षभरातून एकदा भरणार्‍या या यात्रेत गावाकडच्या बायका उत्साहाने बाहेर पडून पोळपाट, लाटणे, कुरडया-शेवयाचे यंत्र, तांब्या पितळीची भांडी आणि गृहोपयोगी दुर्मिळ वस्तूंची खरेदी करत. हे चित्रही आज काळाच्या पडद्याआड गेल्याचे जाणवते. कारण वाढत्या शहरीकरणाचे वारे आता खेडोपाडी पोहचले असून या वस्तू पाहिजे तेव्हा सहज उपलब्ध होत असल्याने त्यात कोणतेही नाविन्य राहिले नाही.

असे असले तरी ग्रामदैवतावरील श्रध्दा, नवस-सायास, यात्रेसाठी माहेरी येणार्‍या सासुरवाशिणी आणि नोकरी धंद्यानिमित्त बाहेरगावी असलेले पण गावच्या यात्रेला आवर्जून हजेरी लावणारे तरुण यात यत्किंचीतही बदल झालेला नाही.त्यामुळे गाव जत्रा बदलली असे म्हणण्यापेक्षा तिने नवे रुप धारण केले असे म्हणावयास हरकत नसावी.

यात्रा काळात स्थानिक हॉटेलांमध्ये पार्ट्यांसाठी हल्ली गर्दी दिसू लागली आहे. लोकनाट्य तमाशा ही लोककलाही आता नावापुरतीच उरली असून गण, गौळण, बतावणी, रंगबाजी याला जवळजवळ तमाशातून फाटाच दिला की काय? असा प्रश्‍न पडतो. केवळ हिंदी-मराठी गाण्यांची मैफल आणि त्यावर मनसोक्त थिरकणारी तरुणाई हेच तमाशाचे स्वरुप झाले आहे. भारुड-भजन आणि दशावतारी खेळांची जागा आर्केस्ट्राने घेतली आहे.टांगा शर्यतीवर शासनानेच बंदी आणल्याने हा खेळ तर नामशेष झाल्यातच जमा आहे

-शरद थोरात

8380885321

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!