Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोरोना : गावांच्या सिमा बंद

Share

भोकर ( वार्ताहर) – अवघ्या जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणू चा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करत असताना यात आता ग्रामिण भागातील युवकही सहभागी होत आहेत. त्यात या युवकांनी आता खेडे गावात पुणे, मुंबई सारख्या शहरातून पळ काढून गावांकडे येणार्‍यांना रोखण्यासाठी गावाच्या सिमा बंद करण्यास सुरुवात केली आहे. त्यात या युवकांनी चक्क रस्त्याच्याकडेची झाडे तोडून रस्त्यावर आडवी टाकून गावाच्या सिमा बंद करण्यास सुरुवात केली आहे.

मोठमोठ्या शहरात नोकरीच्या निमित्ताने गेलेले खेडे गावातील अनेकजण शहराकडे गेले, परंतु गेल्या पंधरा दिवसापासून पुणे, मुंबई सारख्या शहरात कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार वाढत असल्याने धास्तावलेले शहरी बाबू गावाकडे धाव घेत आहेत. आता हा कोरोना खेड्यात येवू नये म्हणून खेडेगावातील युवकांनी कंबर कसली आहे.
त्याचेच उदाहरण म्हणजे श्रीरामपूर-नेवासा राज्य मार्गालगत असलेल्या खोकर व भोकर येथील उत्साही तरूणांनी हा शहरी लोंढा रोखण्यासाठी गावात येणारे रस्ते बंद करण्यास सुरुवात केली आहे.

यासाठी खोकर व भोकर येथील युवकांनी या राज्य मार्गाने खोकर कारेगाव कडे जाणार्‍या रस्त्यावर या युवकांनी मोठे बाभळीचे झाड तोडून आडवे टाकून गावची सिमा बंद केली आहे तर याच्या विरुद्ध दिशेला मुठेवाडगाव, माळवाडगाव, भामाठाण व खानापूरकडे जाणार्‍या खानापूर रोडवर ही अशाच प्रकारे मोठे बाभळीचे झाड तोडून रस्ता अडविला आहे.
काल व परवा अशा दोन दिवसात खोकर व भोकर येथे सुमारे पंचवीस जण गावात आल्याची चर्चा आहे. त्यात खोकरमध्ये एकाचवेळी एकाच गाडीत 15 जण आले असल्याचे खोकरच्या सरपंचांनी सांगितले तर अशाच प्रकारे भोकर येथेही अनेक जण आलेत. त्यांच्याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याचे लक्षात आल्याने हा निर्णय घेतल्याचे या युवकांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!