Friday, May 3, 2024
Homeनगरशिंदे टोळीविरोधात ‘मोक्का’ : सहा आरोपींचा समावेश

शिंदे टोळीविरोधात ‘मोक्का’ : सहा आरोपींचा समावेश

अहमदनगर|Ahmedagar

संघटीत गुन्हे (Crime) करून तोफखाना (Topkhana), एमआयडीसी (MIDC), नगर तालुका पोलीस ठाणे (Nagar Taluka Police Station) हद्दीत आपली दहशत निर्माण करणार्‍या आकाश शिंदे (रा. विळद ता. नगर) टोळीविरोधात मोक्का (Mocca) कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. शिंदे टोळीमध्ये (Shinde Gang) एकुण सहा सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर (Nashik Deputy Inspector General of Police Dr. B. G. Shekhar) यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.

- Advertisement -

आरोपीमध्ये टोळीप्रमुख आकाश पांडुरंग शिंदे (वय 26), टोळी सदस्य महेश मनाजी ऊर्फ मनोहर शिंदे (वय 28), गणेश रमेश शिंदे (वय 30), सागर संजय शिंदे (वय 27 सर्व रा. विळद ता. नगर), स्वप्निल ऊर्फ आदित्य अशोक पाखरे (वय 25 रा. नागरदेवळे ता. नगर), किशोर ऊर्फ ईश्वर शिंदे (वय 24 रा. देहरे ता. नगर) यांचा समावेश आहे. या टोळीविरोधात एमआयडीसी (MIDC), तोफखाना (Topkhana), नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) गंभीर स्वरूपाचे 10 गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलीस ठाणे (MIDC Police Station) हद्दीत मे 2021 मध्ये दरोड्याचा गुन्हा घडला होता.

सदरचा गुन्हा आकाश शिंदे टोळीने केला असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली. शिंदे टोळीने इतरही काही गुन्हे संघटीतपणे केले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. शिंदे टोळीविरोधात मोक्का (Mocca) कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) 28 ऑगस्ट 2021 रोजी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली असून शिंदे टोळीविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई (Action) करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या