Thursday, April 25, 2024
Homeनगरविळद : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ग्रामपंचायत सदस्य देणार मानधन

विळद : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ग्रामपंचायत सदस्य देणार मानधन

सार्वमत

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील विळद येथील ग्रामपंचायत सदस्य संदीप जगताप हे आपले मानधन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार आहेत. तशी सूचना त्यांनी ग्रामसेवक सागर खळेकर यांना केली आहे.

- Advertisement -

कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर मदत तसेच आपला खारीचा वाटा म्हणून आपण हे मानधन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान राज्यातील कोरोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर या कार्यात मदत करु इच्छिणार्‍यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नव्या खात्याची निर्मिती करण्यात आली आहे.  या खात्यात इच्छुकांनी सढळ हाताने मदत जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

तर कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि बाधित रुग्णांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सहाय्यता आणि आपत्कालिन स्थिती मदत निधीची (पीएम-केअर्स) स्थापना केली आहे. सर्व क्षेत्रातील लोकांना या निधीमध्ये आपली मदत पाठवता येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या