Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

निवडणुकीत बूथप्रमुख शोधूनही सापडले नाहीत- विखे

Share

अहमदनगर (प्रतिनिधी) – सत्तेमुळे नेत्यांचे पक्षाच्या संघटनेकडे दुर्लक्ष झाले. विधानसभा निवडणुकीत बूथप्रमुख शोधूनही सापडले नाहीत, असा आरोप भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी केला. मिळालेल्या मतांची जबाबदारी बूथप्रमुखांवर निश्चित केली पाहिजे, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात भाजपच्या झालेल्या पराभवास बूथप्रमुख कारणीभूत असल्याचे विखे यांनी यावेळी अप्रत्यक्षरित्या आधोरेखीत केले.

जिल्ह्यात भाजपच्या संघटनात्मक निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होत आहेत. या निवडणुकीसाठी खा. गिरीश बापट यांची पक्षाने निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मंगळवारी दुपारी बापट व विखे यांनी शासकीय विश्रागृहावर पक्षाच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली.
विखे म्हणाले, बूथप्रमुख निवडणुकीत दिसले नाहीत.

बूथप्रमुखांनी सदस्य नोंदणी करण्यापेक्षा जनतेच्या सुखदु:खात सहभागी झाले पाहिजे. विधानसभा निवडणुकीचा अहवाल जिल्हाध्यक्षांकडे आलेला असेल, असे सांगून ते म्हणाले, सत्तेमुळे नेत्यांचे पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष आहे. नेत्यांनी पक्षाकडे लक्ष द्यायला हवे होते, गिरीश बापट यांच्या अनुभवाचा जिल्ह्यात पक्षाला फायदा होईल, असे ते म्हणाले.

काँग्रेस लिमिटेड कंपनी
काँग्रेसमध्ये पैशाच्या जोरावर पदे मिळत होती, त्यामुळे काँग्रेस लिमिटेड कंपनी बनली, अशी टीका यावेळी राधाकृष्ण विखे यांनी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!