विखे पाटील यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा स्विकारला

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा काँग्रेस पक्षाने स्विकारला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिर्डी येथे दिली.
काँग्रेस-राष्ट्रवादीला राज्यात सकारात्मक प्रतिसाद लाभत असून वाढलेली मतदानाची टक्केवारी आघाडीसाठी फायदेशीर असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी केली.
या निवडणुकीत ते आपल्या मुलाचा प्रचार करीत असल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येत होता. तेव्हापासूनच राजीनामा देण्याबाबत त्यांच्यावर दबाव होता.
आता अशोक चव्हाण यांनी राजीनामा स्विकारल्याची माहिती दिल्याने गेल्या कित्येक दिवसापासुन सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला आहे. दरम्यान विखेंच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस कुणाची वर्णी लावते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*