Type to search

Breaking News क्रीडा

भारताला मोठा धक्का: अंगठ्याच्या दुखापतीमुळे विजय शंकर विश्वचषका बाहेर

Share

लंडन | वृत्तसंस्था

भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याला अंगठ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषका बाहेर जावे लागले आहे. त्याचा जागी मयंक अग्रवाल या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. डाव्या हाताचा फलंदाज मयंक डोमेस्टिक सामन्यानमध्ये कर्नाटका कडून खेळतो. मयंक आतापर्यंत एक दिवशीय विश्वचषक सामना खेळला नाहीये. परंतु त्यांला दोन टेस्ट सामन्यात खेळण्याची संधी दिली गेली होती त्यात त्यानी अर्धशतक केले होते.

अंगठ्याचा दुखापतीमुळे इंग्लंड विरुध्दच्या सामन्यात खेळता आले नाही.

रोहित शर्माने इंग्लंड सोबतच्या सामन्या नंतर सांगितले होते की शंकर ४ नंबरचे फलंदाज आहेत. आणि त्याबद्दल कुठलीच अनिश्चितता नाही. परंतु सामन्या आधीच त्याचा अंगठ्यात दुखापत झाली आहे.

बीसीसीआईने माहिती दिली की डाव्या पायाच्या अंगठ्यात ‘नॉन डिस्प्ले फ्रॅक्चर’ झाला आहे. फ्रॅक्चर ठीक व्हायला कमीत कमी तीन आठवड्याच्या कालावधी लागणार आहे. भारतीय मँनेजमेंट टीमने शंकर यांच्या जागी मयंक अग्रवाल यांना संधी दिली आहे.

प्रँक्टिस दरम्यान बुमराह यांचा चेंडू लागला होता. ह्यावेळी बुमराहने सांगितले होते की हि गंभीर दुखापत नाही. त्यानंतर अफगानिस्थान विरोधात शंकर याला खेळवण्यात आले होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!