Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशविजय मल्ल्याला 28 दिवसांत भारतात आणण्याची शक्यता

विजय मल्ल्याला 28 दिवसांत भारतात आणण्याची शक्यता

सार्वमत

नवी दिल्ली – कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्याचा प्रत्यार्पणाविरोधात अखेरचा मार्गही बंद झाला आहे. लंडन हायकोर्टानंतर आता ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टानेही विजय मल्ल्याची प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली आहे. येत्या 28 दिवसांत त्याला आता भारतात आणलं जाऊ शकतं. मल्ल्याकडे कोणताही कायदेशीर मार्ग शिल्लक नाही त्यामुळे त्याला भारताकडे सोपवले जाऊ शकते. यासाठी भारतीय वंशाच्या प्रीती पटेल या ब्रिटनच्या गृह सचिव अंतिम निर्णय घेणार आहेत. यापूर्वीही ब्रिटनच्या तत्कालीन गृह सचिवांनी मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली होती. पण त्याने लंडन हायकोर्ट आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.

- Advertisement -

प्रत्यार्पणाविरोधात विजय मल्ल्याने यापूर्वी लंडनच्या हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पण यावेळी भारतीय यंत्रणांनी स्वतःची बाजू भक्कमपणे मांडत मल्ल्याला धक्का दिला होता. लंडन हायकोर्टाने कोणताही दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर विजय मल्ल्याने अखेर सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. पण आता सुप्रीम कोर्टानेही याचिका फेटाळल्यामुळे त्याचे सर्व कायदेशीर मार्ग बंद झाले आहेत. ब्रिटनच्या गृह विभागाकडून प्रत्यार्पणासाठी आता लवकरच अंतिम मंजुरी दिली जाणं अपेक्षित आहे.

दरम्यान विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सने सरकारी बँकांचं हजारो कोटींचं कर्ज घेतलं होतं, जे परत केलं नाही. त्यामुळे त्याच्यावर पैशांची अफरातफर आणि फसवणूक असे खटले चालू आहेत. त्याच्याकडून नऊ हजार कोटींची वसुली होणार आहे. यावर कोणत्याही अटी विना कर्ज घ्या आणि खटला बंद करा, अशी ऑफर त्याने दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या